करोनानंतरच्या जगातील राजकीय व आर्थिक बदल कशा प्रकारचे असतील?
जगभरातील बरेच विचारवंत आणि चांगली नियत असलेले विद्वान, वैज्ञानिक आणि अर्थतज्ज्ञ हे मान्य करत आहेत की, या करोना महामारीचे दुष्परिणाम आजपर्यंत झालेल्या दोन्ही जागतिक युद्धासह मागील कोणत्याही संकटापेक्षा मानवजातीला जास्त घातक व हानिकारक ठरणार आहेत. खरे म्हणजे दुसऱ्या जागतिक महायुद्धाची पंचाहत्तरी साजरी करत असतानाच्या काळात हे घडत आहे.......